प्रश्न : इलाजा वेळी पेशंट गोंधळलेल्या अवस्थेत जाऊ शकतात का?
उत्तर : होय. काही पेशंट थोडे गोंधळलेल्या अवस्थेत जाऊ शकतात सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पेशंटने दारूचे सेवन केले आहे का ते बघायला पाहिजे.काही पेशंट तंबाखू, गुटखा खाल्ल्यानंतर पण गोंधळलेल्या अवस्थेत जातात किंवा इरिटेबल किंवा बेचैन होतात,भीती वाटते असे म्हनतात तर ते सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे.असे काही झाले तर त्वरित आम्हाला भेटा डॉक्टरांना भेटा म्हणजे काही प्रॉब्लेम असतील तर त्यातून आपण पेशंटला बाहेर पडू शकतो.
प्रश्न: व्यसनमुक्ती ची औषधे बंद केली तर…..
उत्तर : याच्या नंतर कधी कधी थोडे दिवस झाले की पेशंट एकदम औषधे बंद करतो तर नातेवाईकांची पहिली स्टेप आहे की लगेच आमच्याशी संपर्क करावा.
पेशंटने औषधे बंद केली आणि दारू पिण्यास चालू केला तर लगेच आमच्याशी संपर्क करतात.पण पेशंट औषध बंद केलं आणि त्याच्यावर जर पेशंट दारू पीत नसेल तर नातेवाईक स्वतःचे समाधान करून घेतात,ही औषधे तर बंद आहेत पण पेशंट दारू पीत नाही म्हणजे चांगले चालले आहे. असे म्हणून दुर्लक्ष करतात आणि अचानक पंधरा दिवसांनी, महिन्याने किंवा तो एकदम दारू प्यायला लागतो कारण काय नऊ ते दहा महिने दारूची आठवण राहू शकते त्यामुळे ट्रीटमेंट ही एक वर्षापेक्षा जास्त घेणं घेतो की नाही हे नातेवाईकांनी बघणे हे अत्यंत जरुरीचे आहे म्हणून गोळ्या बंद केला तर लगेच भेटावे.
प्रश्न :पूर्वी औषध घेत होता नंतर बंद करून दारू घेतो?
उत्तर: केल्यानंतर घरी जातो,व्यवस्थित औषधे घेत असतो आणि दारू बंद असते पेशंटला नंतर हळूहळू वाटायला लागतं की औषधांची गरज नाही,मी कंट्रोल करू शकतो,सोडू शकतो.
मग हळूहळू पेशंट आपल्या वागण्यातून बदल दाखवतो. पेशंट म्हणतो औषधे ठेवा, माझं मी नंतर औषध घेतो. काही वेळा म्हणतो की मी अर्धीच घेतो, एक वेळेस घेतो, मला फार झोप येते, मला औषधांची गरज नाही हे सिग्नल द्यायला सुरुवात करतो म्हणजे पेशंट डोक्यामध्ये औषध घेण्याची इच्छा नाही किंवा बंद करण्याचा प्लॅन आहे,हे ओळखता आले पाहिजे. म्हणजे धूर येत आहे,आग लागण्याची शक्यता आहे.नातेवाईकांनी ताबडतोब लक्षात घेतले पाहिजे. थोड्या दिवसात दारू पिण्याची रिस्क आहे. त्यामुळे ताबडतोब त्या पेशंटला, फोर्सफुल्ली काहीतरी सांगून आमच्याईथे ट्रीटमेंटला ला घेऊन या पेशंट अचानक दारू बंद केला,तर आमच्याशी संपर्क करा.काय करू शकतो,हे विचारा आम्हाला भेटा,आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू.
प्रश्न : आता व्यसनमुक्ती साठी किती दिवस घेतली पाहिजे?
उत्तर : काहीही करून पेशंटने ट्रीटमेंट एक वर्ष घेतो की नाही याकडे लक्ष असणे अत्यंत जरुरी आहे. आणि दुसरं असं हे औषधे चालू आहेत की हे औषध कंटिन्यू का करायला पाहिजेत? कारण इच्छा तर नऊ ते दहा महिने असते.
प्रश्न : 100% दारू सुटेल का?
उत्तर : लक्षात घ्या,व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि कोणतेही हॉस्पिटल कोणतेही डॉक्टर शंभर टक्के गॅरंटी व्यसनमुक्तीसाठी देऊ शकत नाहीत.आमच्याकडे वैयक्तिक सक्सेस रेट 92 ते 94 टक्के आहे. याचं कारण असं की पाच टक्के आम्हाला failure का येतो?अपयश का येते?
प्रश्न :अपयश का मिळते?
उत्तर : काही काही जणांची एका anti craving मेडिसिने तलक जाऊ शकते. काहीवेळा ट्रीटमेंट घेतल्यानंतर पंधरा दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर पेशंट म्हणतो मला पिण्याची इच्छा होत आहे, तर त्यावेळी परत तुम्ही आम्हाला भेटा आणि दुसऱ्या प्रकारचे औषध आम्ही चालू करतो.परत इच्छा झाली पिण्याची इच्छा तर आम्ही तिसऱ्या प्रकारचे औषध,चौथ्या प्रकारचे औषध असे चार पाच प्रकारची औषधे या सर्वांचा उपयोग करून पेशंटची तलफ घालवतो.
प्रश्न :याशिवाय फॅमिली सपोर्ट
उत्तर :कारण हेच पेशंट रेगुलर आमच्याकडे येत नाहीत,आम्हाला भेटत नाही,औषध व्यवस्थित घेतो की नाही नातेवाईक बघत नाहीत किंवा औषधे व्यवस्थित घेतो, तरी पेशंटची तलफ जात नाही तर म्हटले की दुसऱ्या प्रकारचे औषध तिसऱ्या प्रकारचे औषध आम्ही देण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्यायला पाहिजे.आणि हे संधी मिळाल्यानंतर व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट सुरू करता येते पेशंटचा व्यसनमुक्त होण्याची शक्यता वाढते.
काही व्यसनी पेशंटना दुसरे मानसिक आजार पण असतात. जसे की स्किझोफ्रेनिया आहेत,बायपोलार मूड डीसॉर्डर, डिप्रेशन या आजारांमध्ये पेशंटला कळत नाही की त्यांचे काय चुकत आहे.त्यामुळे कंटिन्यू पिण्याचे रिस्क राहतो. त्यामुळे मानसिक आजाराची सुद्धा ट्रीटमेंट करणे गरजेचे आहेत.नाहीतर पुन्हा दारू पिण्याचे धोका वाढतो.
दारूची ट्रीटमेंट आहे ती एक ते दीड वर्ष घ्यायला पाहिजे.नातेवाईकांनी जागे राहायला पाहिजे.पेशंट एकदा जरी औषध घेतले नाही तर आमच्याशी संपर्क करा आणि पुढची ट्रीटमेंट option आहे 2nd लाइन 3rd लाइन पद्धती हि करण्याची संधी मिळते आणि पेशंटला व्यसनापासून मुक्त होण्याची शक्यता वाढते.
प्रश्न : आणखी बरेच काही जणांचा प्रश्न असतो की बीपी शुगरचा त्रास आहे आणि ह्या गोळ्या चालतील का?
उत्तर : तर आम्ही सर्व प्रकारच्या टेस्ट केल्याचं असतात जसे की रुटीन ब्लड टेस्ट शुगर फंक्शन किडनी फंक्शन टेस्ट लिवर फंक्शन टेस्ट (CBC, BSL, RFT, LFT )केल्या असतात .
जरुरी पडली तर आम्ही फिजिशियन चे मत घेतले जाते सोनोग्राफी केलेली असते एक्स-रे काढलेला असतो आमचे औषध सुरू ठेवून ज्या काही निगडीत असलेले आजार आहे जसे बीपी असेल शुगर असेल तर या सुद्धा मेडिसिन कंटिन्यू करायला काय हरकत नाही.
प्रश्न : व्यसनमुक्तीसाठी औषधे चालू असताना काही पेशंटची तक्रार असते की झोपेत लघवी होते?
उत्तर : हो असे काही औषधांमुळे होऊ शकते तरी डॉक्टरांना भेटून मेडिसिन ऍडजेस्ट केले की त्याच्यातून प्रश्न दूर होऊ शकतो.
प्रश्न : काहींची तक्रार अशी असते कि डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला फार झोप येते सुंद होतो असे म्हणतात?
उत्तर : यामध्ये घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण सुरुवातीला ट्रीटमेंटचा भाग म्हणून औषधे दिलेली असतात आणि जसं जसे त्यामध्ये Improvement होते तसतसें शरीर नॉर्मल व्हायला लागते आणि शरीराची औषधांची गरज कमी व्हायला लागते झोप जास्त येणे किंवा सुस्त होणे तोतरे बोलणे काही पेशंटला व्हायला लागतं अशा वेळी नातेवाईकांनी घाबरायचं नाही त्वरित आम्हाला संपर्क करू शकता आमच्या हॉस्पिटल ला येऊ शकता औषधे ऍडजेस्ट करून पेशंट बरा होऊ शकतो.
Leave a Reply