4. Tobacco / Cigarette Addiction

4. Tobacco / Cigarette Addiction

4. Tobacco / Cigarette Addiction

व्यसन लागण्याची कारणे

  • आई-वडिलांचे अनुकरण
  • इतरच्या आग्रहामुळे
  • शौक, मौज म्हणून
  • अनुवंशिकता
  • इतर व्यक्तींचे अनुकरण
  • फुशारकी मारण्यासाठी
  • मानसिक कारणे – चिंता, अपयश, उदासीनता, अधिक ताणतणाव, ताण, प्रेमभंग
  • कुतूहल/चुकीचे नवनवीन प्रयोग

* सहज उपलब्ध आहे म्हणून किंवा चमचमणान्या पुड्यात काय आहे ते पाहुया म्हणून देखील मावा, गुटख्याच्या पुड्या फोडल्या जातात आणि व्यसनाची सुरवात होऊ शकते.

* माझे पप्पा किंवा मित्र नाकातून धुर कसा काडतात याचे कुतुहल म्हणून

  • जगभरात होणाऱ्या लाखोंच्या मृत्यूमागील एक कारण आहे तंबाखूचं वाढतं सेवन !!

तंबाखु ( Tobacco )जन्य पदार्थ

  • आपल्या देशात तंबाखू पासून अनेक प्रकारचे नशीले पदार्थ बनविले जातात.
  • सुशिक्षित व उच्चभ्रू लोक जास्त करून सिगरेटचे व्यसन करतात
  • ग्रामीण भागातील लोक वा शहरी भागातील मजूरवर्गात सिगरेट प्रमाणे बिडी ओढून आपली व्यसनाची तलफ भागवितात.
  • गुटखा,मावा,जर्दा हे नशीले तंबाखूजन्य पदार्थ आपल्या देशात फार लोकप्रिय आहेत.
  • जास्त करून पुरुष लोक अशा प्रकारचे व्यसन करताना आढळून येतात तर महिला या जास्त करून तंबाखू मिश्री किंवा तपकीर याचा वापर करून आपली तलफ भागवितात.
  • आजकाल हुक्का हा पुरातन व्यसनाचा प्रकार आजकालच्या युवापिढीमध्ये पुन्हा प्रचलित झाला आहे.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम

तंबाखूमध्ये अनेक प्रकारची केमिकल असतात. जसे

  • निकोटीन (Nicotine)
  • टार आणि
  • कार्बन मोनोऑक्साइड

असे अनेक हानीकारक केमिकल्स असतात. तंबाखूचा फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. चला जाणून घेऊया शरीरावर होणारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम !!

धूम्रपानाचे परिणाम

  • गरोदर मातेने तंबाखू / मिश्री / सिगारेटचा वापर केला तर त्याचा परिणाम गर्भावर होऊन गर्भाची वाढ खुंटू शकते.
  • धूम्रपान करून आपण केवळ आपलेच आरोग्य बिघडवतो असे नाही तर आपल्या आजूबाजूच्या निष्पाप व्यक्तींचा आरोग्यालाही आपण धोका निर्माण करत असतो.
  • तंबाखूमुळे पेशींची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होऊन  अशक्तपणा येणे, धाप लागणे, धडधडणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे असे विकार उद्भवतात.
  • रक्तवाहिन्यात गुठळी होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा किंवा मेंदूचा झटका येऊ शकतो.
  • जेव्हा व्यक्ती धुम्रपान करते तेव्हां तोंडातील रक्तपुरवठा ७०% नी कमी होतो. रक्तवाहिन्यात गुठळी झाल्यामुळे पायाला रक्तपुरवठा कमी होऊन गँगरीन होऊन पाय काढण्याची वेळ येऊ शकते.

सिगरेट, गुटखा, मावा इत्यादीचे परिणाम

tabacco

दात लालसर पिवळे होतात हिरड्यांना सूज येते व रक्तखाव होतो.

तंबाखूचे परिणाम

तंबाखू चघळणाऱ्या व्यक्तींना सबम्यूकस फायब्रोसीस होऊ शकतो. या आजारामध्ये तोंड पुर्णपणे उघडता येत नाही. तोंडातील लाळग्रंर्थीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन लाळग्रर्थीचे विकार होतात.

तंबाखू धुम्रपानामुळे अनेक प्रकारचे श्वसनविकार उदभवतात.

  • वसननलिकेचा दिर्घकालीन दाह (Chronic Bronchitis)
  • दमा (OPI)
  • सीओपीडी
  • दिर्घकाळाची सर्दी, खोकला

कर्करोग (कॅन्सर)

tobacco

 

  • फुफ्फुस
  • जठर
  • मुत्रपिंड
  • जिभेवर, गालावर तपकिरी लालसर चट्टा पडतो.
  • जीभ
  • गाल
  • घसा
  • अन्ननलिका

धूम्रपानाच्या उपचारा बद्दल अधिक माहिती साठी येथे क्लीक करा

तंबाखूच्या दुष्परिणामा बाबत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

Leave a Reply