World Mental Health Day

World Mental Health Day

World Mental Health Day

World Mental Health Day

जगाला मानसिक आरोग्याचे महत्त्व समजण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबरला 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' (World Mental Health Day) साजरा केला जातो.

आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यातील खूप कमी व्यक्ती मानसिक तणावातून बाहेर पडतात. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मानसिक तणाव, डिप्रेशन, एंजायटीपासून हिस्टीरिया, डिमेंशिया, फोबिया सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जगाला मानसिक आरोग्याचे महत्त्व समजण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबरला 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' (World Mental Health Day) साजरा केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती होण्यास मदत होते.

‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’चा इतिहास

'जागतिक मानसिक आरोग्य दिना'ची सुरुवात 1992 साली झाली. संयुक्त राष्ट्रसंघाचे उपमहासचिव रिचर्ड हंट आणि वर्ल्ड फेडरेशनने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. या फेडरेशनमध्ये 150 पेक्षा अधिक देशांचा समावेश आहे. 1994 सालातील संयुक्त राष्ट्रसंघाचे तत्कालीन महासचिव यूजीन ब्रॉडीने एक थीम ठेवत हा दिवस साजरा करण्याचे सांगितले. तेव्हापासून मानसिक आरोग्याचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी आणि याबाबत जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो.

 

‘जागतिक मानसिक आरोग्य दिन 2023’ची थीम

 

“Mental Health is a universal human right.”

 

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व

बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावं लागत आहे. स्टिग्मा, डिमेंशिया, हिस्टीरिया, एग्जाइटी, आत्महीनता यांसारख्या आजारांचा त्यामुळे सामना करावा लागतोय. मानसिक आजारावर किंवा समस्यांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये मानसिक आरोग्याची जनजागृती करण्यात येत असते. तसेच मित्रपरिवार, नातलग आणि समाजाला समजून घेणे देखील गरजेचे असते.

 

मानसिक आरोग्य (Mental Health) आणि भारतातील परिस्थिती

2015-16 मधील एका सर्वेक्षणानुसार, भारतात दर 8 व्यक्तींमध्ये 1 व्यक्ती म्हणजेच, 17.5 कोटी लोकं कोणत्या ना कोणत्या एका मानसिक आजाराचा सामना करत आहेत. यातील 2.5 कोटी लोक गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांच्यावर तत्काळ उपचार करणं गरजेचं आहे.

 

निर्मल हॉस्पिटल उपचार पद्धती

 

मानसिक आजार (Mental Illness) म्हणजे नक्की काय ? आणि मानसिक आजार कसे ओळखावे ? याबद्दल मी थोडक्यात माहिती घेणार आहे.

सर्वप्रथम आपण मनाचा त्रिकोण म्हणजे काय ? हे बघूया. ज्यालाच आम्ही Equilibrium Triangle  असे म्हणतो. ह्या Triangle चे तीन भाग असतात. Thought, Emotion आणि Behavior. 

Thought म्हणजे विचार , Emotions म्हणजे Feelings त्याला आपण भावना असे  म्हणतो. आणि Behavior म्हणजे Action. Thought , Emotion , Behavior हे तीन मनाचे घटक आहेत. आणि या तिघामध्ये समन्वय योग्य असेल तर मनाने ती व्यक्ती संतुलित आहे असे आपण म्हणू शकतो.

जर या तीन पैकी एकाही गोष्टींमध्ये बिघाड झाला म्हणजे हा Triangle बिघडला असा आम्ही म्हणतो. म्हणजेच ती व्यक्ती मनाने Disturb आहे असं आपण म्हणतो. मग मानसिक आजार कोणकोणते असू शकतात. तस पाहिलं तर list फार मोठी आहे पण  common जे Psychiatric Illness असतात ते बघूया.
  1. डिप्रेशन उदासीनतेचा आजार जो common आहे.


  1. स्किझोफ्रेनिया ज्याला छिन्नमानस म्हणतात.


  1. Bipolar Mood Disorder ज्यालाच हर्षवायू उन्मादचा आजार असं म्हणतात   किंवा मनोशारीरिक आजार सोमॅटो फॉर्म डिसऑर्डर म्हणतात.


  1. OCD ज्याला obsessive Compulsive Disorder म्हणतात किंवा मंत्रचाळेपणा म्हणतात.


  1. Phobia ज्याला भीतीचा आजार असे म्हणतात.


  1. लैंगिक समस्यांचा आजार जस की शीघ्रपतन असेल नपुसंकता असेल त्यानंतर


  1. लहान मुलांच्या समस्या असतील


  1. वृद्धांच्या मानसिक समस्या असतील जुनाट डोकेदुखी ज्याला chronic हेड इक म्हणतात. असे काही आजार मानसिक आजार असू शकतात.


  1. महत्वाचा group ज्याला मानसिक आजारामध्ये पकडलं जात. consider केलं जात. तो म्हणजे व्यसनांचा आजार दारू असेल , तंबाखू असेल , गुटखा , मावा , भांग , गांजा , चरस वेगवेगळ्या व्यसनांचा देखील मानसिक आजारामध्ये समावेश केलेला आहे.

 

टीप : प्रत्येक मानसिक आजाराची सविस्तर माहिती पुढील Blog मध्ये  पाहूया

Leave a Reply