National Cancer Awareness Day 2023 : आज आहे ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस’; जाणून घ्या यामागील लक्षण आणि उपचार

National Cancer Awareness Day 2023 : आज आहे ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस’; जाणून घ्या यामागील लक्षण आणि उपचार

National Cancer Awareness Day 2023 : आज आहे ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस’; जाणून घ्या यामागील लक्षण आणि उपचार

National Cancer Awareness Day 2023 

भारतात 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ साजरा केला जातो. या दिवशी कर्करोगासारख्या धोकादायक आजाराबद्दल जनजागृती केली जाते. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन’ हा दिवस सर्वप्रथम 2014 मध्ये साजरा करण्यात येईल असे तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले होते. त्यानुसार दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन (National Cancer Awareness Day)’ देशभर साजरा करण्यात येतो. कर्करोग आणि त्याची लक्षणे तसेच त्याच्या उपचाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization – WHO) अभ्यासानुसार कर्करोग हे जगभरात होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाचे महत्त्व (National Cancer Awareness Day Importance) :

2014 मध्ये, आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाचे मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या आजाराला वेळीच पकडण्याची गरज ओळखून त्यांनी या दिवसाची सुरुवात केली. या दिवशी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या दवाखान्यात लोकांना मोफत तपासणी केली जाते. हा दिवस नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. त्यांनी कर्करोगाशी लढण्यासाठी दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिन पाळतात.

कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगानं आपला जीव गमवावा लागतो. बदलती जीवनशैली, भेसळयुक्त आहार, व्यसनं आदी कारणांमुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येतं.रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर), ब्रेन ट्युमर,स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), स्तनाचा कर्करोग इ. विविध प्रकारच्या कर्करोगांनं लाखो लोक त्रस्त आहेत.

अलीकडच्या काळात अनेक प्रसिद्ध लोकांना कर्करोगाचं निदान झाल्याचं आणि काहींचा मृत्यू झाल्याचंही आपण पाहिलं. सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचं गतवर्षी कर्करोगानं निधन झाले. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत शरद पोंक्षे यांनाही कर्करोग झाला. क्रिकेटपटू युवराज सिंग यानंही कर्करोगावर मात केली. धुरंधर राजकारणी शरद पवार यांनाही कर्करोग झाल्याचं सर्वश्रुत आहे.देशात कॅन्सर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने १९७५ मध्ये राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आणि १९८४-८५ मध्ये कर्करोगाला प्रतिबंध आणि लवकर निदान करण्यावर जोर देण्यात आला होता. २०१४ मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवसाची घोषणा केली होती. हा दिवस प्रसिद्ध फ्रेंच-पोलिश शास्त्रज्ञ मादाम क्युरी यांच्या जयंतीदिवशी हा दिवस साजरा केला जातो. क्युरी यांनी रेडियम आणि पोलोनियमचा शोध आणि कर्करोगाविरूद्धच्या लढा यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यामुळे कर्करोगाच्या उपचारांसाठी अणुऊर्जा आणि रेडिओथेरपीचा विकास झाला.

कर्करोगाचं लवकर निदान करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि कर्करोगास कारणीभूत जीवनशैली टाळण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतात दरवर्षी सुमारे १.१ दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. कर्करोगाच्या दोन-तृतीयांश प्रकरणांचे निदान प्रगत टप्प्यावर होते, ज्यामुळे रुग्णांची जगण्याची शक्यता कमी होते. भारतात दर ८ मिनिटाला एका महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. २०१८ मध्ये तंबाखूमुळे (धूम्रपान आणि धुम्रपानरहित) ३,१७,९२८ (अंदाजे) स्त्री -पुरुष मृत्यूमुखी पडले.लॅन्सेटच्या अहवालानुसार, तंबाखूचा वापर १४ प्रकारच्या कर्करोगासाठी कारणीभूत असून इतर कारणांमध्ये अल्कोहोल, मादक पदार्थांचा वापर आणि खराब आहार यांचा समावेश होतो. असुरक्षित संभोग हा देखील गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण ठरु शकतो. स्त्रियांमध्ये हा कर्करोगाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे. तंबाखूचे सेवन आणि वायू प्रदूषण इ.मुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका असतो.डॉ. हर्षवर्धन सांगतात की, कर्करोगाचं लवकर निदान झाल्यास त्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करता येतो. त्यासाठी होणारा खर्चही तुलनेनं कमी असतो आणि लवकर उपचार जास्त परिणामकारक ठरतात. त्यामुळे कर्करोगाची लक्षणं दिसल्यास ताबोडतोब तपासणी केल्यानं वेळेत उपचार होतो. पर्यायानं मृत्यू दरही लक्षणीयरित्या कमी होतो.राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाच्या निमित्ताने लोकांना मोफत तपासणीसाठी सरकारी रुग्णालये, CGHS आणि महानगरपालिका दवाखान्यात जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. कर्करोग होण्यापासून कसे वाचावं आणि सुरुवातीच्या लक्षणांचा शोध कसा घ्यावा याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती पुस्तिका मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जातात.

Leave a Reply