स्किझोफ्रेनिया – (Schizophrenia):
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची विचारशक्ती, वर्तन, भावना आणि वास्तवाशी असलेला संपर्क हळूहळू बिघडू लागतो. या आजाराची सुरुवात अनेकदा हळूहळू होते.
अगदी सुरुवातीच्या काळात या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. म्हणून हा आजार समजुन घेणे गरजेचे आहे.स्किझोफ्रेनियाची सुरुवातीची लक्षणे आणि हा मानसिक आजार वेळेवर ओळखणे का महत्त्वाचे आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Schizophrenia : सुरुवातीची लक्षणे (Early Warning Signs)
स्किझोफ्रेनियाची सुरुवात साधारणतः किशोरवयात किंवा तारुण्यात दिसून येते. लक्षणे हळूहळू विकसित होतात. ज्यामध्ये वर्तनात बदल, विचार आणि बोलण्यात बदल, भावनिक बदल, भास आणि भ्रम ही लक्षणे दिसू लागतात. याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1. वर्तनात बदल
एकटेपणा किंवा एकटे राहण्यास पसंद करणे
मित्र, कुटुंब, समाजापासून दूर राहणे
अभ्यास किंवा कामातील रस कमी होणे
स्वतःशी बोलणे किंवा हसणे
2. विचार आणि बोलण्यात बदल
विचारांची गती कमी किंवा विस्कळीत होणे
निरर्थक किंवा विसंगत बोलणे
संशयित किंवा विचित्र कल्पना व्यक्त करणे
“कोणी माझ्यावर लक्ष ठेवते” असे वाटणे
3. भावनिक बदल
चेहऱ्यावर भावना न दिसणे
आनंद, दुःख, प्रेम अशा भावनांचा अभाव
उदासीनता किंवा भावनिक तटस्थता
4. भास आणि भ्रम (Hallucinations & Delusions)
कानात आवाज ऐकू येणे
दोन लोक माझ्याबाबतीत बोलत आहेत अशी चुकीची भावना
वास्तव आणि कल्पना यातील फरक न ओळखणे
5. दैनंदिन जीवनातील बदल
झोपेचा व आहाराचा ताळमेळ बिघडणे
स्वतःची स्वच्छता व देखभाल कमी होणे
एकाग्रतेचा अभाव
वेळेवर ओळखणे का महत्त्वाचे?
स्किझोफ्रेनियाचा प्रारंभिक टप्पा (Prodromal Phase) ओळखल्यास आजार वाढण्यापासून रोखता येतो.
सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास रुग्ण वास्तवापासून पूर्णपणे तुटतो.
वेळेवर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास उपचाराने रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.
आजाराचे निदान लवकर लागल्याने उपचार जलद करता येतात.लवकर उपचार सुरु केल्यामुळे दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होतात.
Leave a Reply