- जगभरात होणाऱ्या लाखोंच्या मृत्यूमागील एक कारण आहे तंबाखूचं वाढतं सेवन !!
तंबाखुजन्य पदार्थ
- आपल्या देशात तंबाखू पासून अनेक प्रकारचे नशीले पदार्थ बनविले जातात.
- सुशिक्षित व उच्चभ्रू लोक जास्त करून सिगरेटचे व्यसन करतात
- ग्रामीण भागातील लोक वा शहरी भागातील मजूरवर्गात सिगरेट प्रमाणे बिडी ओढून आपली व्यसनाची तलफ भागवितात.
- गुटखा,मावा,जर्दा हे नशीले तंबाखूजन्य पदार्थ आपल्या देशात फार लोकप्रिय आहेत.
- जास्त करून पुरुष लोक अशा प्रकारचे व्यसन करताना आढळून येतात तर महिला या जास्त करून तंबाखू मिश्री किंवा तपकीर याचा वापर करून आपली तलफ भागवितात.
- आजकाल हुक्का हा पुरातन व्यसनाचा प्रकार आजकालच्या युवापिढीमध्ये पुन्हा प्रचलित झाला आहे.
तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
तंबाखूमध्ये अनेक प्रकारची केमिकल असतात. जसे
- निकोटीन (Nicotine)
- टार आणि
- कार्बन मोनोऑक्साइड
असे अनेक हानीकारक केमिकल्स असतात. तंबाखूचा फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर जास्त प्रमाणात परिणाम होतो. चला जाणून घेऊया शरीरावर होणारे तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम !!
Leave a Reply