Sex Counselling
- मग हस्तमैथुन करणे चांगले की वाईट?
तर आमच्या शास्त्रानुसार हस्तमैथुन करणे म्हणजे अजिबात चुकीचे नाही, वाईट नाही.याचं कारण असं हस्तमैथुन म्हणजे काय हाताने वीर्य पाडणे आणि संभोग म्हणजे काय डायरेक्ट पुरुषाचे म्हणजे शिसनाणाचे योनी शी संबंध येतो आणि योनीमध्ये वीर्यपतन करतो.मग दोन्हींमध्ये फरक काय?इथे फक्त हाताने करतो आणि तिथं डायरेक्ट स्त्रीशी संबंध आहे पण दोन्ही मध्ये सिमिलॅरिटी काय आहे तर दोन्हींमध्ये वीर्यपतन होतं.मग हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येतो हा गैरसमज आहे.
माणसाची ताकद कशात असते माणसाची ताकत ही रक्तामध्ये असते आणखी एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे शंभर थेंब 200 थेंब रक्तापासून एक वीर्य बनतो.असा गैरसमज आहे हे लक्षात घ्या वीर्य हे खाली पुरस्थ ग्रंथी आणि टेस्टी यांना वृषण असे म्हणतात या ग्रंथीच्या Secretion मुळे या ग्रंथीचे जे स्त्राव आहेत या ग्रंथीचा स्त्राव यांमधून हे वीर्य बनते.जसे लाळ हे लाळेचा ग्रंथी पासून बनते तसेच वीर्य हे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत त्यांच्या ग्रंथीच्या एकत्र आल्यामुळे वीर्य बनत मग माणसाची ताकद ही रक्तात आहे का वीर्यात आहेत तर रक्तात ही ताकद असते, विर्यात अजिबात ताकत नसते.
- मग हस्तमैथुन हे फक्त unmarried लोक करतात का?
तर तसे काही नाही,तर हस्तमैथुन कोणतीही व्यक्ती करू शकते जसे की अन मॅरीड आहे म्हणून हस्तमैथुन करू शकतो आणि ज्यांचे लग्न झालेला आहे तो हस्तमैथुन करू शकतो का? जर बरेच पुरुष हे लग्न झालेले असले तरी ते हस्तमैथुन करतात त्याचे कारण असे की काही वेळा पत्नी जवळ नसते, काही वेळा ती प्रेग्नेंट असते, माहेरी गेलेली असते,अशावेळी जर पुरुषांची संभोग करण्याची इच्छा झाली तर त्याच्याकडे हस्तमैतुन शिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो.
हस्तमैथुन म्हणजे मानवाचे प्राथमिक जीवन आहे आणि काम विकासाचा पाया आहे असे म्हणण्यास हरकत नाही सर्वे केला गेला यामध्ये शंभर टक्के पुरुष हस्तमैथुन करतात आणि 70 टक्के स्त्रिया देखील हस्तमैथुन करतात तर पुरुषांमध्ये हस्तमैथुन म्हणजे जे शिस्न आहे त्या शिसनाला पुढे मागे करून वीर्यपतन केले जाते आणि स्त्रियांमध्ये हस्तमैथुन म्हणजे स्तन किंवा शिसनिकाला कुरवाळून त्याची कामपूर्ती केली जाते.
वीर्यनाशामुळे कमजोरी आली आहे असे आपण म्हणत असाल तर मला सांगा
हस्तमैथुनामुळे वीर्य बाहेर येते,संभोग केल्यामुळे वीर्य बाहेर येते किंवा स्वप्नदोष होतो जे झोपेमध्ये वीर्य जाते त्यावेळी सुद्धा वीर्य नाश होतो किंवा लघवी संडास करताना पण वीर्य जाते मग या चार प्रक्रिया आहेत त्या नॉर्मल आहेत. जर हस्तमैथुनामुळे वीर्य बाहेर जात याला जर अशक्तपणा होतो असा जर आपण विचार केला तर संभोग मध्ये काय? तर संभोगा मध्ये पण वीर्य बाहेर जाणार ना.मग जगात जेवढे काही प्रजनन क्रिया आहेत जी नॉर्मल म्हटली जाते,म्हणजे प्रत्येक स्त्री-पुरुष हे त्याच्या आयुष्यामध्ये संभोग करतात ती पण कमजोर होतात का?
तर तसं काही नसते त्यामुळे हस्तमैथुन केल्यामुळे वीर्य जर बाहेर जात असेल तर ते नॉर्मल आहे. हस्तमैथुन केल्यामुळे किंवा संभोग केल्यामुळे किंवा स्वप्न दोष किंवा धातू लघवीतून जात असेल तर या प्रक्रिया नॉर्मल आहेत त्यामुळे अशक्तपणा आणि वीर्य दोष किंवा वीर्यनाश याचा काहीही संबंध नसतो.
काही पेशंट असे म्हणतात की झोपेमध्ये पहाटे वीर्यनाश होतो त्यांची इनर वेअर असते ती ओली होते अशी काही पेशंटची शंका असते याला स्वप्नदोष असे म्हणतात.
संडास किंवा लघवी करत असताना पांढरा सा पदार्थ जातो याला धात सिंड्रोम असे म्हणतात, किंवा काही पेशंटमध्ये वीर्यस्खलन लवकर होत म्हणजे शिघ्रपतन याचा त्रास आहे असे म्हणतात याला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन असे म्हणतात.
काही पेशंटमध्ये अजिबात ताठरता येत नाही किंवा ताठरता येण्यासाठी वेळ लागतो यालाच इरेक्टाइल डिसफंक्शन असे म्हणतात अशा बऱ्याच लैंगिक समस्या या पेशंट मध्ये आढळून येतात तर आपण आज एकेक विषयावर चर्चा करणार आहोत.
- लैंगिकतेबाबत आणखी एक महत्त्वाची शंका की लिंगाचा आकार लहान आहे किंवा लिंगाची जाडी कमी आहे लिंग मोठे करू शकतो का?
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की साधारणपणे प्रत्येक मनुष्याची रचना ठरलेली आहे, म्हणजे कुणाची उंची कमी असते कुणाची उंची जास्त असते कोण जाड आहे कोण बारीक आहे जसे की हाताची बोटे काही सारखी नसतात मग एखाद्या व्यक्तीचे लिंग लहान आहे म्हणजे काय? लिंग लहान आहे असे आपण कधी म्हणू शकतो?तर समजा त्या व्यक्तीची करंगळीची तुलना केली, त्याचे तीन भाग केले तर तिसरा भाग आहे तो एक इंच लिंगाची लांबी ताठरता नसताना असेल तर ती साईज नॉर्मल आहे असे आपण म्हणण्यास हरकत नाही. याचं कारण असं स्त्रीमध्ये जी योनी आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन इंचापर्यंत संवेदना असते,त्यामुळे एखाद्या पुरुषाच्या लिंगाची ताठरता आल्यानंतर दीड इंच जरी ताठरता आली तरी तो स्त्रीला समाधान देण्यापूरत योग्य आहे.त्यामुळे जास्ती साइज मोठी आहे किंवा जास्ती लांबी आहे म्हणजे स्त्रीला समाधान आहे हा गैरसमज आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाचा लिंगाचा जो आकार आहे जो साईज आहे तो एक इंच जरी असेल ताठरता नसताना आणि ताठरता येऊन दीड इंच किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल तर ते नॉर्मल आहे म्हणण्यास काही हरकत नाही.
- सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पेशंटमध्ये आढळतो तो म्हणजे लिंगाची लांबी आपण वाढवू शकतो का?
तर मी मगाशी म्हटलं की एखाद्या पुरुषाचं लिंग हे ताठरता नसताना एक इंच जरी असेल तरी ती साइज नॉर्मल आहे म्हणण्यास हरकत नाही. पेपर मध्ये किंवा टीव्ही मध्ये आपण बऱ्याच जाहिराती बघतो जसे की एक तेल आहे किंवा जपानी पट्टी नमा म्हणून यंत्र आहे त्यांचा वापर करून लिंगाची लांबी वाढवु शकतो अशी ही जाहिरात असते, तर लक्षात घ्या ह्याच्यामध्ये कोणतेही तेल,औषध किंवा यंत्र किंवा मशीन नाही ज्याची लिंगाची लांबी वाढवु शकते तसे पाहिले तर आपल्या शरीराचा कोणताही अवयव किंवा कोणत्याही भागाची लांबी आपण कमी किंवा जास्त करू शकत नाही आपल्या शरीराच्या हाताची बोटे जी आहेत ती बोटे कमीजास्त करू शकत नाही कानाचे किंवा नाकाचे साईज कमी जास्त करु शकत नाही म्हणजे थोडक्यात कोणत्याही औषधाने किंवा कोणत्याही मशीन ने त्याच्यात आपण बदल करू शकत नाही.
हा हे नक्की आहे की प्लास्टिक सर्जरी ने काही दोष निर्माण झाले असतील काही विकृती निर्माण झाले असतील तर त्याचा करेक्शन साठी प्लास्टिक सर्जरी चा वापर होऊ शकतो.
लिंगाच्या बाबतीत जर विचार केला तर एखाद्या व्यक्तीला लिंगाचा कॅन्सर असेल,तर कधीकधी समोरचा भाग कट करावा लागतो किंवा कमी करावा लागतो. यासाठी प्लास्टिक सर्जरी,रिकन्स्ट्रक्शन सर्जरी कधी कधी करावी लागते. कधी कधी एक्सीडेंट मध्ये इजा होते त्यावेळी प्लास्टिक सर्जरी चा वापर करून रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्याच्या आकारांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो.
लक्षात घ्या की कोणतेही औषध किंवा तेलाने किंवा मशिन ने लिंगाचा आकार वाढवू शकत नाही जर असे कोणी म्हटले असेल की आम्ही तेल किंवा मशीन ने लिंगाची साईज जी आहे तो वाढू शकतो,लांबी वाढू शकतो असे म्हणत असेल तर ती फसवेगिरी आहे हे आपण लक्षात घ्यावे.
- आणखी एक महत्वाची शंका कि लिंग वाकडे आहे?
साधारणपणे प्रत्येक पुरुषाचे लिंग हे एक तर डाव्या बाजूला झूकलेलं असेल किंवा उजव्या बाजूला झुकलेले असेल काही पेशंटचे लिंग थोडं वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला झुकलेल असेल तर कोणत्याही पुरुषाचे लिंग हे सरळ नसते त्यामुळे कुणाचे लेफ्ट साईडला किंवा राइट साईडला झुकलेलं असतं मग हे असे का जसे एखाद्या व्यक्तीला भांग पाडण्याची सवय असते कोणी डाव्या बाजूला भांग पाडतो कोणी उजव्या बाजूला भांग पाडतो तसेच लहानपणापासून इनर वेअर घालायची सवय असते आणि त्या सवयीनुसार लिंग डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ठेवण्याची सवय लागते आणि त्यामुळे लिंग हे डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलेले असतं.
आपल्याला माहितीये की लिंगामध्ये हाड अजिबात नसते. ताठरता येण्याची मतलब आहे ताठरता जर योग्य असेल तर योनीमध्ये लिंगाचा प्रवेश होऊ शकतो आणि संभोग प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते.संभोगासाठी लिंग वाकडे असणे किंवा लिंग डाव्या किंवा उजव्या बाजूला असेल तर प्रॉब्लेम येतो असं काही नसतं त्यामुळे लिंग वाकडे असेल किंवा डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलेले असेल वरती किंवा खाली असेल तर हे नॉर्मल आहे.
जगामध्ये कोणतेही औषध मलम यंत्र मशिन नाही त्याच्यामुळे आपण लिंग सरळ करू शकतो त्यामुळे लिंग वाकडे असणे हे नॉर्मल आहे घाबरायचं काही कारण नाही.
- पुढची शंका जी पेशंट मध्ये आढळते ती म्हणजे लिंगाची जाडी वाढू शकतो का?
आपणा सर्वांना माहीत आहे की बाळाचा जन्म होतो तो योनीमधून होतो आणि योनी ची क्षमता आहे ती म्हणजे बाळाचे डोकं ज्या साइज चे असेल तेवढी योनी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची जे करंगळी आहे त्या करंगळी जर लिंगाची जाडी असेल तरी ते स्त्रीला समाधान देण्याइतपत योग्य आहे.आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लिंगाची लांबी आपण वाढवू शकत नाही.त्या पद्धतीने कोणतेही औषध आणि किंवा तेलाने किंवा मशीन ने आपण लिंगाची जाडी वाढू शकत नाही सर्वांनी हे लक्षात घ्या की लिंगाची जाडी जास्तीत जास्त असेल किंवा लिंगाची लांबी जास्त असेल म्हणजे स्त्रीला जास्त समाधान मिळतं हे चुकीचं आहे स्त्रीला दीड इंच जरी पुरुषाच्या लिंगाची ताठरता आल्यानंतर लिंगाचा साईज असेल आणि जाडी ही करंगळी एवढी असेल तरीही स्त्रीला समाधान देण्याइतपत योग्य असतं आपण हे लक्षात घ्यावं.
- आणखी एक शंका म्हणजे वीर्याचे प्रमाण कमी आहे किंवा वीर्य पातळ आहे?
लक्षात घ्या वीर्य जे बनत ते ग्रंथिच्या स्त्रावा पासून बनते.तसेच Testis (वृषण )किंवा समायनल वेसिकल्स किंवा प्रोस्टेट ग्रंथी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथीचा स्त्राव यापासून हे वीर्य बनते.मग वीर्याचे प्रमाण कमी आहे असे म्हणतात साधारणपणे दोन ते तीन ml देखील वीर्य असेल तरी ते नॉर्मल आहे म्हणण्यास हरकत नाही. मग वीर्य पातळ आहे असे पेशंट कधीकधी म्हणतात ग्रंथीच्या वेगवेगळ्या स्त्रावापासून वीर्य बनत असतं विर्यांचा जर पृथक्करण केलं तर ते वेगवेगळ्या घटका पासून बनलेले असते.जसे की वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड असतील गंधक आहे किंवा फॉस्फरस, नाइट्रोजन, सोडियम,पोटॅशियम,फ्रुक्टोज,इनोसितोल असे वेगवेगळे घटक आहेत ते वीर्यामध्ये आढळतात
- मग वीर्य पातळ आहे म्हणजे नक्की काय?
लक्षात घ्या की मूल होण्यासाठी वीर्य पातळ असणे घट्ट असणे काहीही संबंध नसतो वेगवेगळ्या ग्रंथीचा स्त्राव यापासून वीर्य बनत असते.जर समजा प्रोस्टेट ग्रंथी पासून स्रावाचे प्रमाण जास्ती असेल तर कधीकधी वीर्य पातळ आढळते किंवा बऱ्याच वेळा संभोग केला नसेल, पाच-सहा दिवस वीर्य संकलन झालं नसेल तर त्या वेळीसुद्धा पेशंटमध्ये वीर्य घट्ट आहे असं आढळून येतं.पण लक्षात घ्या वीर्य पातळ असणे किंवा कमी असणे याचा काही लैंगिकतेचा किंवा सेक्स जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा काहीही संबंध नसतो.
काही पेशंट ची शंका अशी असते की मी पहिल्यांदा संभोग करतो त्यावेळी वीर्य हे योग्य प्रमाणात पडतं दुसरा जो atempt करतो त्या वेळी वीर्य कमी येते,वीर्याचे प्रमाण हे कमी असते.
लक्षात घ्या वीर्य हे ग्रंथीच्या वेगवेगळ्या स्त्रावपासून बनते.मग एकदा जर विर्य सत्खलन झाले तर समजा एखाद्या रात्री पहिल्यांदाच क्रिया केली आणि वीर्य संकलन झाले दोन ते तीन ml वीर्य बाहेर पडलं तर प्रत्येक पेशंट असे म्हणते की दुसऱ्यांदा मी करताना वीर्याचे प्रमाण कमी असते किंवा वीर्य हे अजिबात येत नाही हे नॅचरल आहे, कारण वीर्याची जी साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती समायल वेसिकल थैली ती एकदा रिकामी झाल्यानंतर पुन्हा भरण्यास नक्कीच वेळ लागतो साधारणपणे एक दिवसाचा कालावधी याला लागतो म्हणजे 24 तासांचा सायकल आहे जेथे समायल वेसिकल्स मध्ये वीर्य पुन्हा जमण्यास वेळ लागेल त्यामुळे एकदा जर विर्य सत्खलन झाले त्यामुळे समायल वेसिकल्स जी ग्रंथी आहे त्याच्यामध्ये वीर्य साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती निर्माण होण्यासाठी साधारणपणे 24 तासांचा कालावधी लागतो त्यामुळे सेकंड Attempt मध्ये वीर्य हे कमी असणे किंवा वीर्य अजिबात न पडणे हे नॉर्मल आहे.
- वीर्याबाबत महत्त्वाची समस्या आढळते ती म्हणजे स्वप्नदोष होणे.
पेशंट असे म्हणतात की आम्ही झोपलेलो असताना पहाटे पहाटे वीर्यस्खलन होतं किंवा अंडर पॅन्ट ओली होते यालाच स्वप्नदोष असे म्हणतात मग स्वप्नदोष होणं हे चुकीचे आहे का नॉर्मल आहे, तर शास्त्रीय दृष्ट्या हे नॉर्मल आहे.
जेवढे जेवढे पुरुष आहेत त्यांना स्वप्नदोषाच अनुभव हा नक्कीच येतो. मग स्वप्नदोष होतो म्हणजे नक्की काय होतं मी मगाशी म्हनालो की वेगवेगळ्या ग्रंथीचा स्त्रावापासून वीर्य तयार होते.वीर्यस्खलन हे हस्तमैथुनामुळे किंवा नॉर्मल एखाद्या स्त्रीशी संभोग केल्यानंतर स्खलन होतो.
मग विर्याची जी पिशवी आहे saminal वेसिकल्स ही पिशवी जर रिकामी झाली नाही तर वीर्य जाणार कुठे? जर एखाद्या व्यक्तीने संभोग केला नाही किंवा हस्तमैथुन केलं नाही तर विर्याचा साठा हा वाढत जातो आणि ही जी वीर्य तयार होण्याची प्रक्रिया आहे ही लाळेसारखी आहे, जशी लाळ की रोज निर्माण होते तसे वीर्य हे वेगवेगळ्या ग्रंथी पासून रोज तयार निर्माण होते.त्यामुळे जर हस्तमैथुन केले नाही किंवा संभोग केला नाही तर रात्री म्हणजे पहाटे पहाटे वीर्य संकलन होण्याची शक्यता असते,आणि ही नॉर्मल प्रक्रिया आहे पहाटे पहाटे ताठरता येते आणि वीर्य संकलन होतं त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही जर हस्तमैथुन केले नाही किंवा संभोगाचे प्रमाण जर कमी असेल तर त्याचे प्रमाण हे कंटिन्यू तयार होत असल्यामुळे रात्री विर्यस्खलन हे नॉर्मल आहे म्हणजेच काय स्वप्नदोष हे नॉर्मल आहे घाबरून जाण्याचं काही कारण नाही हा मोठाआजार नाही स्वप्नदोष हे नॉर्मल प्रक्रिया आहे.
काही पेशंटमध्ये आणखी एक महत्वाची समस्या आढळते शंका आढळते, ती म्हणजे लघवी किंवा संडास करताना धातू जातो
कसं असतं की मूत्रनलिका आणि वीर्यनलिका ही एकमेकांना जोडलेली असते आणि ज्या ठिकाणी जोडतात तिथे एक झडप असते त्यामुळे लघवी करत असताना वीर्यनलिका बंद असते त्यामुळे लघवी करत असताना लघवी बाहेर येते किंवा संभोग करत असताना जी मूत्रनलिका आहेत.ती झडप बंद असते त्यामुळे वीर्य बाहेर पडते जर त्या झडपे मध्ये काही प्रॉब्लेम असेल झडपेमध्ये काही कारणास्तव बिघाड असेल तर ग्रंथीचे काही आजार असतील प्रोस्टेट ग्रंथीचे काही आजार असतील किंवा डायबिटीज इतर आजारांमुळे झडपे मध्ये काही प्रॉब्लेम होतो त्यावेळी वीर्य कधीकधी लघवीतून जाण्याची शक्यता असते संडास करताना पण वीर्य जातं असं म्हणतात याचं कारण असं की संडास करताना पुरस्थ ग्रंथी प्रोस्टेट ग्रंथी वर ताण पडतो त्यामुळे स्त्राव हा लघवीतून जातो.
Usually जर analysis केलं तर ते phosphate असते.त्यामुळे टिपिकल वीर्य जाते असं काही नाही तर ते पाण्याचे स्त्रोत असते.तो पुरस्थ ग्रंथी चा असतो त्याच्यामध्ये फॉस्फेट असतं त्यामुळे पांढरा कलर दिसून येतो.
त्यामुळे जर संभोग केला नाही हस्तमैथुन केले नाही तर विर्याचा साठा तसाच असल्यामुळे झोपेमध्ये कधीकधी वीर्य जातो कधी कधी लघवी किंवा संडास करताना पुरस्थ ग्रंथी वर दाब पडल्यामुळे तिथल्या सेक्रेशन्स ह्या लघवी मध्ये मिसळतात आणि त्यामुळे पांढरा स्त्राव दिसतो ती पण नॉर्मल प्रक्रिया आहे. पांढरा स्त्राव दिसतो ती पण नॉर्मल प्रक्रिया आहे.त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही वीर्यनाश होतो असे म्हणून चालणार नाही. जसे लाळग्रंथी पासून लाळ रोज बनते तसेच हे प्रॉस्टेट ग्रंथी समायल बेसीकल्स या ग्रंथी पासून वीर्य हे रोज तयार होतं त्यामुळे वीर्यनाश होणे म्हणजे ताकद कमी झाली किंवा अशक्तपणा आला किंवा काहीतरी नुकसान होते असे समजण्याची काहीही गरज नाही.
- Delayed Ejaculation म्हणजे काय ?
आणखी एक लैंगिक समस्या जी पुरुषांमध्ये आढळते ती म्हणजे विलंबित वीर्यस्खलन ज्याला delayed इजॅक्युलेशन असे म्हणतात
त्याच्यामध्ये पेशंटची तक्रार अशी असते की वीर्य संकलन व्हायला वेळ लागतो हा कालावधी साधारण सात मिनिटे ते चाळीस मिनिट वेळ लागतो पेशंट म्हणतो पूर्वी मला वेळेस वीर्य स्खलन होत होतं आता माझी वीर्यस्खलन करण्याची इच्छा आहे पण वीर्यस्खलन होत नाही.मी स्वतः थकून जातो किंवा पत्नी ही थकून जाते
- मग विलंबित वीर्यस्खलानाची नक्की कारणे कोणते?
यासाठी मानसिक कारणे किंवा औषधे शारीरिक कारणे ही जबाबदार असतात मानसिक कारणांमध्ये एखाद्या पेशंटच्या मनामध्ये स्त्रीबद्दल जर घृणा असेल गैरसमज विर्या बाबत असेल जर वीर्यनाश म्हणजे अशक्तपणा किंवा माझी संपूर्ण ताकद निघून जाईल किंवा जास्त वेळ टिकून ठेवणे म्हणजे मी खराब करतो असे काही समजत असेल तरीही या विलंबित बीर्य संकलनाची समस्या काही पेशंटला दिसू शकते
काही पेशंटमध्ये डायबिटीज चा आजार असेल तरी विलंबित वीर्यस्खलन दिसते.काही पेशंटमध्ये मानसिक आजार असेल आणि औषधोपचार चालू असतील तर त्या औषधामुळे पण वीर्यस्खलन होत नाही अशा पेशंटमध्ये म्हणजेच delayed इजॅक्युलेशन वीलंबित वीर्यस्खलानाचा आजार हा दिसू शकतो.
- विलंबित वीर्यस्खलनाची ट्रीटमेंट कशी करायची?
यासाठी औषधोपचार आणि कौन्सिलिंग ची मदत घेणे आवश्यक आहे काउंसलिंग च्या सहाय्याने पेशंटच्या मनात असणारे गैरसमज आपण दूर करू शकतो.काही औषध विचारांमध्ये किंवा शेड्यूलमध्ये बदल करून ट्रीटमेंट करू शकतो.साधारणपणे जे अँटी डिप्रेसन्ट असतात त्यांचा वापर केल्यामुळे सुद्धा विलंबित वीर्य स्कलणाचा आजार उद्भवतो यासाठी आमचा साधारणपणे असा सल्ला असतो की Anti depressant चा वापर तुम्ही संभोग केल्यानंतर करायचे उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा एखादी व्यक्ती रात्री नऊनंतर मेडिसिन घेते संभोगाची प्रक्रिया रात्री अकरा-साडेअकरा वाजता घडते त्यामुळे काय होतं जर नऊ वाजता मेडिसिन घेतले असतील तर पेशंट संबंध साडेअकरा वाजता ठेवत असताना वीर्य स्खलन होत नाही कारण त्या औषधामुळे विर्य स्खलन होत नाही तर अशा केसेसमध्ये आमचा सल्ला त्या कपलला असा असतो की जे मेडिसिन तुम्ही रात्री घेणार असाल तर ते मेडिसिन तुम्ही संभोग झाल्यावर घ्यावे म्हणजे हा जो विलंबित वीर्य स्खलंनाचा प्रॉब्लेम आहे तो आपण बंद करू शकतो.
- सर्वात महत्वाची शंका जी आढळते ती म्हणजे वीर्य म्हणजे शक्ती असते काय ?
वीर्य नाश झाला म्हणजे शक्ती नाश झाला अशक्तपणा आला असे बरेच पेशंटची शंका असते मला असे म्हणायचे आहे समजा मी जर हाताला ब्लेड ने कापले तर काय बाहेर निघेल, रक्त बाहेर निघेल,माणसाचा एक्सीडेंट झाला किंवा अपघात झाला तर कशाची बॉटल चढवतात? रक्ताची ना का वीर्याची चढवतात तर लक्षात घ्या माणसाची ताकत ही रक्तामध्ये असते वीर्यामध्ये नसते 100 थेंब किंवा 200 थेंब रक्तापासून एक थेंब वीर्य बनत असा गैरसमज आहे.
मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जसे लाळ असेल किंवा लघवी असेल किंवा धातू असेल हे वेगवेगळ्या ग्रंथी पासून बनलेले असते.त्यामुळे माणसाची ताकत ही रक्तामध्ये असते वीर्यामध्ये नसते. लाळ ही लाळग्रंथी पासून बनते वीर्य हे ग्रंथीच्या वेगवेगळ्या स्त्रावा पासून बनतात तर रक्त हे हाडापासून बनलेलं असतं. माणसाची ताकद ही रक्तामध्ये असते विर्या मध्ये नसते.जर पुरुषाची ताकद वीर्यामध्ये असेल तर स्त्रीची ताकद कशात आहे विचार करण्यासारखं आहे ना माणसाची ताकत ही रक्तामध्ये असते वीर्यात अजिबात नसते.
- सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे लैंगिक समस्या निर्माण का होतात?
आपल्याला ज्या समस्या आढळतात त्या प्री मॅच्युअर इजेक्युलेशन म्हणजे शिघ्रपतन आणि नपुंसकता म्हणजे इरेक्टाईल डिसफंक्शन ताठरता अजिबात येत नाही या प्रमुख समस्या आढळतात मग हे जे समस्या आहेत त्या का निर्माण होतात तर त्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक आजार डिप्रेशन असेल उदासीनता किंवा भीतीचा आजार परफॉर्मन्स Anxiety असेल तरी या लैंगिक समस्या निर्माण होतात.
कधीकधी हार्मोन इंबॅलन्स होतो त्याच्यामुळे सेक्स करण्याची इच्छा अजिबात होत नाही त्याने सुद्धा लैंगिक समस्या निर्माण होतात आणि कधीकधी शारीरिक आजार जसे की ब्लडप्रेशरचा त्रास असेल,शुगरचा त्रास असेल किंवा व्यसनामुळे रक्तवाहिनीमध्ये दोष निर्माण होतो, त्यामुळे पण ह्या लैंगिक समस्या निर्माण होतात. रक्तवाहिनी जर व्यवस्थित असेल तर ताठरता व्यवस्थित येते.रक्तवाहिनी दोष,जर डायबिटीज असेल ब्लडप्रेशर असेल किंवा तंबाखू गुटखा सिगारेट किंवा दारू किंवा कोणतेही व्यसन,व्यसनाच्या पदार्थांमुळे रक्तवाहिनीमध्ये दोष निर्माण होतो.रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही त्यामुळे ताठरता व्यवस्थित होत नाही त्यामुळे लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात.
अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ बघा
- लैंगिक समस्येवर उपचार ट्रीटमेंट कशी केली जाते यावर आपण चर्चा करणार आहोत
आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तर आम्ही त्यांची डिटेल मध्ये हिस्ट्री घेतो त्यांचा शंका असतात त्याचा पूर्णपणे अभ्यास करतो त्याचे गैरसमज आहे.त्याबद्दल चर्चा करतो जर गैरसमज असेल तर काउन्सेलिंग गैरसमज दूर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यानंतर त्या पेशंटला शिघ्रपतन प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, त्याला इरेक्टल्स डीस फंक्शन असे म्हणतो म्हणजे ताठरता अजिबात येत नसेल तर त्या ट्रीटमेंट वर आपण भर देतो.
एकदा लैंगिक समस्या कोणत्या आहेत याचे निदान झाले की ट्रीटमेंटला सुरुवात करतो ट्रीटमेंटला सुरुवात करण्यापूर्वी तपासण्या करणे अत्यंत आवश्यक आहे,जसे की ब्लड टेस्ट,ब्लड टेस्ट मध्ये रुटीन ब्लड टेस्ट किंवा किडनी फंक्शन टेस्ट,लिवर फंक्शन टेस्ट करणे अत्यंत जरुरी आहे गरज पडल्यास urine म्हणजे लघवीची तपासणी करने सुद्धा आवश्यक आहे
काही पेशंटला जर हार्मोनच्या बाबतीत काही शंका असेल तर हॉर्मोनटेस्ट करणे सुद्धा जरुरी आहे.कधीकधी पॅथॉलॉजी म्हणजे जर वृषण मध्ये किंवा लिंगामध्ये जर काही दोष आहे.कन्फर्म करायचे असेल तर सोनोग्राफी करणे सुद्धा जरुरीचे आहे म्हणजे स्क्रोटल सोनोग्राफी किंवा penile डॉपलर स्टडी म्हणजे लिंगाची जी रक्तवाहिनी आहे त्याचा सुद्धा अभ्यास करणे हे आवश्यक आहे.
एकदा तपासण्या झाले की ट्रीटमेंटला सुरू केली जाते.ट्रीटमेंट मध्ये औषधोपचार आणि काउंसलिंग असे दोन टप्प्यामध्ये ट्रीटमेंट केली जाते
औषध उपचारामध्ये समजा एखाद्या पेशंटला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शिघ्रपतन याचा त्रासअसेल तर औषधे हे सुरू केले जातात त्या औषधांच्या मदतीने जी ताकद आहे ही जास्त वेळ टिकूनराहण्यासाठी मदत घेतली जाते म्हणजे औषधांच्या सहाय्याने ताठरता टिकवून ठेवायची आणि
काउंसलिंग मध्ये sex करण्याचे काही मेथड आहेत जेणेकरून तुमची ताकद ही टिकवून ठेवता आली पाहिजे
जसे की स्टार्ट स्टॉप टेक्निक असेल किंवा squeez टेक्निक असेल किंवा कीगल एक्सरसाइज असेल तर या दोन-तीन मेथडने ताठरता ही जास्ती टिकवून ठेवण्यासाठी पेशंटला एज्युकेशन देऊ शकतो. त्यामुळे औषधोपचार आणि कौन्सिलिंग या मदतीने आपण शिघ्रपतन किंवा premature इजॅक्युलेशन वर मात करू शकतो
ट्रीटमेंट करण्यापूर्वी हार्मोन्स मध्ये जर दोष असेल तर इंडॉक्रिनोलॉजी किंवा हार्मोन्सचे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांची मदत घेऊन सुद्धा आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो म्हणजे त्या-त्या हार्मोन्सच्या दोषानुसार ट्रीटमेंटचा ऑप्शन घेऊ शकतो
जर इरेक्टल डिसफंक्शन पेशंटला असेल यालाच नपुसंकता आपण म्हणतो जर असे काही असेल तर काही औषधे आहेत किंवा इंजेक्शन आहेत त्यांची मदत घेऊन आपण ताठरता आणू शकतो जसे tadafilacitrate किंवा इंजेक्शन आहे किंवा फुल म्हणून इंजेक्शन आहे या इंजेक्शन मार्फत आपण ताठरता आणू शकतो
कधीकधी दोन-तीन प्रकारचे औषध आहे ज्यांचा वापर करून सुद्धा आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकतो,त्यापलीकडे जर औषधाने फरक पडला नाही किंवा इंजेक्शन ने फरक पडला नाही तर काही वेळा औषधोपचार किंवा काउंसलिंग वर भर दिला जातो आणि आपण ट्रीटमेण्ट सक्सेस करू शकतो कधीकधी इतर पर्याय vaccume डिवाइस किंवा penile इन प्लांट म्हणतो त्याचा पण वापर करून ट्रीटमेंट ही करू शकतो.
लैंगिक समस्या बाबत आमचा सर्वांना एक सल्ला असा राहील की पेपर मध्ये वेगवेगळ्या जाहिराती येतात कॅप्सूल बाबत किंवा तेला बाबत किंवा मशीन बद्दल जाहिराती येतात त्यावर विश्वास ठेवु नका ती फसवेगिरी असू शकते त्यामुळे तुम्ही या बाबतीत तज्ञ डॉक्टरांची मदत घेऊ शकता किंवा काउंसलर ला भेटा किंवा सायकॅट्रिस्टना भेटा म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य उपचार मिळेल याशिवाय वेगवेगळ्या stimulation टेक्निक किंवा उद्दीपन करण्याच्या टेक्निक, इमॅजिनेशन कोणत्या प्रकारचं करायचं किंवा fantacy कोणत्या प्रकारे क्रिएट करायचं संभोग करताना वेगवेगळ्या पोझिशन मध्ये संभोग करायचे कसे, याचा आम्ही स्लाईड प्रेझेंटेशन द्वारा पेशंट कौन्सिलिंग करतो जेणेकरून त्या पेशंटच्या समस्या आहेत त्या प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन शिग्रपतन असेल इरेक्टल डिसफंक्शन असेल किंवा समस्या आम्ही दूर करू शकतो.
अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ बघा
Leave a Reply