Site icon Nirmal Hospital, Miraj

World No Tobacco Day 2024

World No Tobacco Day

धूम्रपान टाळा आरोग्य सांभाळा

आजच्या काळात मोठ्या संख्येने लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेट, बिडी, तंबाखू अशा अनेक प्रकारात ते हे विष आपल्या शरीरात विरघळत आहेत. आज जगातील लोकसंख्येचा मोठा भाग तंबाखूच्या आहारी गेला आहे. जाणूनबुजून किंवा नकळत लोक स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत. तंबाखूपासून होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो, ज्याचा उद्देश जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या माध्यमातून लोकांना तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरूक केले जाते. “जागतिक तंबाखू विरोधी दिन ” हा सार्वजनिक आरोग्यावर तंबाखूच्या वापराच्या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वैयक्तिक तंबाखू अवलंबित्व कमी करण्यासाठी समर्पित कार्यक्रम आहे. आज तंबाखूमुळे होणारी हानी पाहता जगभरातील सर्व देशांची सरकारे तंबाखूजन्य पदार्थावर कडक नियम लागू करत आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. तंबाखूमुळे तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर होतो, असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता मात्र तरीही लाखो लोक दररोज तंबाखूचे सेवन करतात.

एका सर्वेक्षणानुसार (GATS – II) 2016 – 2017, भारतात धूम्रपान करण्यापेक्षा धूरविरहित तंबाखूचा वापर जास्त आहे. 42.4% पुरुष, 14.2% स्त्रिया आणि 20.8% सर्व प्रौढ सध्या धूम्रपान करतात किवा धूरविरहित तंबाखू वापरतात. आकडेवारीनुसार, 19% पुरुष, 2% स्त्रिया आणि 10.7% प्रौढ सध्या धूम्रपान करतात, तर 29.6% पुरुष, 12.8% स्त्रिया आणि 21.4% प्रौढ धूम्रपान विरहित तंबाखू वापरतात, 199 दशलक्ष लोक धूरविरहित तंबाखू वापरता जे 100 दशलक्ष लोक सिगारेट किवा बिडी वापरतात. तंबाखूच्या धुरात हायड्रोजन सायनाईड, फॉर्मल्डीहाईड, शिसे आर्सेनिक, बेंझीन, अमोनिया यांसारखी हजारो रसायने असतात.

तर मग जाणून घेऊया तंबाखू सेवनाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम  

तंबाखूच्या व्यसनामुळे आपल्या जीवनात दुरोगामी परिणाम होतात. तंबाखूच्या व्यसनाचा परिणाम आपल्या जीवनावर खालील प्रमाणे पडतो.

शारीरिक

1. फुफ्फुसांवर (On The Lungs)

तंबाखूमधील निकोटीन हा मोठी रक्तवाहिनी कडक बनवून टाकते.

त्यामुळे तंबाखूचा उपयोग करणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो.

त्यांना खोकल्यासोबतच कफची समस्याही होते.

तंबाखूचा फुफ्फुसांवर सर्वात वाईट परिणाम म्हणजे वातस्फिती (फुफ्फुसांचा आजार) आणि फुफ्फुसांचा कॅन्सर आहे.

2. मेंदूवर (On The Brain)

तंबाखूमळे लकवा, पॅरालीसीस, विसरभोळेपणा, एकाग्र क्षमता कमी होणे.

3. त्वचेवर (On The Skin)

हे त्वचेवर परिणाम करून सुरकुत्यांसाठी कारणीभूत ठरतात. कोरडी आणि पिवळी त्वचा तंबाखू खाणाऱ्यांमध्ये दिसून येते. या शिवाय तंबाखूयुक्त उत्पादनांनी तुमच्या त्वचेला एक प्रकारची दुर्गंधीही येते.

4. केसांवर (On The Hair)

तंबाखूच्या सेवनाने तुमचे केस पातळ आणि नाजूक होतात.काहीवेळा जास्त प्रमाणात तंबाखूचं सेवन केल्यास केस गळून टक्कलही पडू शकते.

5. रक्ताच्या पेशींवर (On Blood Cells)

नियमित रूपाने तंबाखूचं सेवन केल्यास तुमच्या मांसपेशींवर परिणाम होऊन रक्तपुरवठा आणि ऑक्सीजनच्या प्रवाहावर परिणाम होऊ लागतो.परिणामी, व्यायाम, खेळणं किंवा शारीरिक हालचालींमध्ये सामील झाल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो.

6. कर्करोग

  1. अन्ननलिका
  2. फुफ्फुस
  3. जठर
  4. मुत्रपिंड
  5. जीभ
  6. गाल
  7. घसा
  8. जिभेवर, गालावर तपकिरी लालसर चट्टा पडतो.

मानसिक आरोग्यावर (On Mental Health)

तंबाखू सोडण्याचे उपाय

Treatment Option

8 D Formula

8 डी सोडून तुम्हाला आणखी काही नियम

डॉ. चंद्रशेखर हळींगळे 

(M.B.B.S., D.P.M)

मानसोपचार आणि व्यसनमुक्तीतज्ज्ञ निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र, मिरज.

 

 

 

Exit mobile version