Site icon Nirmal Hospital, Miraj

Panchakarma (पंचकर्म)

Panchakarma

वमन

शासकीय पद्धतीने शरीराच्या ऊर्ध्व भागातून उलटीवाटे दोष बाहेर काढणे म्हणजे ‘वमन’ याचा फायदा ॲलर्जीक सर्दी , त्वचाविकार, दमा, सायानुसायटीस, मायग्रेन , लठ्ठपणा, मधुमेह, नाक-कान-घशाचे विकार तसेच कफ विकारांमध्ये होतो.

शिरोधारा

औषधी तेल, ताक अथवा काढे यांची डोक्यावर अभिषेकासारखी धार धरणे. या क्रियेला शिरोधारा म्हणतात. झोपेच्या तक्रारी, झटके येणे, मानसिक विकार, विशिष्ट डोकेदुखी, ट्रायजेमिनल न्युरालिया, व्यसनाधीनता, वारंवार येणारी चक्कर इ.

स्वेदन

स्वेदन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीच, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया आहे. ज्या प्रक्रियेमुळे किंवा औषधांमुळे शरीरात घामाची निर्मिती होते, त्याला ‘स्वेदन’ असे म्हणतात.

नस्य

औषधी तेल, तूप, वनस्पतीचा रस किंवा पूर्ण नाकाद्वारे सोडणे म्हणजे नस्य, तत्पूर्ती स्नेहन, स्वेदन केले जाते. याचा उपयोग वरचेवर होणारी सर्दी, ॲलर्जीक सर्दी, नाकातील वाढलेले हाड, मासांकुर, अर्धशिशी , सायनुसायटीस यासाठी होतो.

बस्ती

यामध्ये आजाराची तीव्रता, कालावधी व रुग्णाचे बळ यानुसार 8/15/30 दिवस दररोज स्नेहन, स्वेदन करून त्यानंतर शौचाच्या मार्गावाटे औषधीसिद्ध तेल, तूप, दुध तसेच मध, सैंधव, काढे यांचे मिश्रण ठराविक मात्रेत दिले जाते.

पत्र पिंड स्वेदन

पत्र पिंड स्वेदन ही पंचकर्मामध्ये वापरली जाणारी सर्वात महत्वाची सडेशन थेरपी आहे. उपचारादरम्यान, रुग्णाच्या शरीराच्या विविध भागांना विशेष कुळंबु किंवा औषधी तेलात बुडवलेल्या किझी नावाच्या बंडलने एकसमान मालिश केली जाते.

रक्तमोक्षण

शरीरातील एखाद्या अंगातून दुषित रक्त काढले जाते. यासाठी सिरिंज किंवा जलौका (जळू) यांचा वापर करतात. त्वचारोगात याचा वापर करतात. त्वचारोगात याचा वापर अत्यंत खुबीने करता येतो.

कटीबस्ती

मान, पाठ किंवा कंबरेवर दुखणाऱ्या ठिकाणी औषधी तेल साठवून ठेवून त्याचा शेक देणे आणि स्पॉंडिलायसिस  सायटिका सारख्या आजारात या वेदनांची तीव्रता लगेच कमी होते.

उद्वारताना

हर्बल पावडर किंवा पेस्ट (स्निग्धा किंवा रुक्षा आहे यावर अवलंबून) संपूर्ण शरीरावर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने घासली जाते. साधारणपणे खोल स्ट्रोकिंग वापरले जाते. आयुर्वेदिक पावडर मसाज शरीराच्या 7 पोझिशनमध्ये चोळण्याने आणि विशिष्ट कालावधीसाठी दाबाने मालिश करून केला जातो.

नेत्र तर्पण

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, तक्रारी कमी करण्यासाठी औषधी तेल किंवा तूप डोळ्यांवर साठवून ठेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करणे याला ‘नेत्र तर्पण’ म्हणतात. डोळ्यांची आग होणे, खाज होणे, चष्म्याचा नंबर वाढणे अशा आजारात याचा उत्तम फायदा होतो.

जानुबस्ती

गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज, वंगण कमी होणे, गुडघ्यांना सूज अशा तक्रारीमध्ये गुडघ्यांवर तेल साठवून त्याने शेक देण्याच्या या उपचाराने लक्षणे बरीच कमी होतात.

हेड मसाज

 

हेड मसाज म्हणजे तुम्हाला अगदी केसांच्या मुळांपासून मसाज द्यावा लागतो. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास आणि तुमचा नियमित तणाव कमी होण्यास मदत होते.

विरेचन

शास्त्रीय पद्धतीने शरीराच्या अधोभागातून जुलाबावाटे दोष बाहेर काढणे म्हणजे ‘विरेचन’ याचा उपयोग पित्ताच्या सर्व विकारात, त्वचारोग, दमा, मासिक पाळीच्या तक्रारी, उष्णतेचे विकार या तक्रारी मध्ये फायदा होतो.

स्नेहन

स्नेहन ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची तांत्रिक प्रक्रिया आहे व वाढलेला वातदोष कमी करण्याचीही प्रक्रिया आहे. स्नेह म्हणजे स्निग्ध पदार्थ, ज्यामुळे शरीराला स्निग्धत्व येते , मऊपणा येतो, शरीरात ओलावा निर्माण होतो त्या प्रक्रियेला ‘स्नेहन’ असे म्हणतात.

पादाभ्यंग

‘पादाभ्यंग’ या उपचार पद्धतीचा उल्लेख ‘चरकसंहिता’ तसेच इतर अनेक आयुर्वेदिक पौराणिक ग्रंथामध्ये आढळतो. पुरातन  काळापासून आपले पूर्वज नियमितपणा ‘पादाभ्यंग’ म्हणजे कास्याचा धातूने तळपायांना मसाज करून स्वस्थ निरोगी दीर्घायुष्य उपभोगत होते. 

Exit mobile version