‘रांधा वाढा उष्टी काढा असं आपण लहानपानपासून ऐकत आलो आहोत.आई, मावशी, आज्जी, ताई अश्या अनेक नात्यात बांधलेली ती स्त्री. शिकलेली असो व नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून फिरणारी नोकरी करणारी स्त्री असो. तिची रांधणे, वाढणे आणि उष्टी काढणे ही कामे कधीच चुकणार नाहीत.किंवा तिने ती केलीच पाहिजे अशी घरातल्या प्रत्येकाची अपेक्षा. किमान ८ तास बाहेर राहणारी ती या आठ तासात किमान यातून सुटते पण कायम घरात काम करणारी ती माउली तिची सुटका मात्र होऊच शकत नाही. शारीरिक, मानसिक,कौटुंबिक, सामाजिक, वयक्तिक पातळीवरील तिची लढाई निराळीच. म्हणूनच तिच्या कामाचे महत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात देखील विशद केले आहे. नुकताच राष्ट्रीय गृहिणी दिवस” साजरा झाला त्यानिमित्ताने तिच्याविषयी आणि तिच्या मानसिक अवस्थेविषयी जाणून घेऊया.
आज मैं ऊपर, आसमाँ नीचे आज मैं आगे, ज़माना है पीछे I खामोशी या चित्रपटातील गाण्यासारखा प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र मिळेलचं असं नाही. प्रत्येकाची मर्जी सांभाळत असताना तिची दखल प्रत्येक घरात घेतली जाईलच असं नाही.आज अनेक स्त्रियांची सकाळ हि ५ चा गजर झाला कि सुरु होते आणि रात्र हि ११ किंवा १२ च्या टोल्यावर म्हणजेच झोपेची वेळ हि घरातील इतर झोपेच्या वेळेनुसारच. असं चित्र जवळपास सगळीकडेच आपण पाहतो.
घरातील काम करणं हे शिक्षण न घेतल्याचं काम. तिला काय जमणार बाहेरील काम, तीन घरातीलच काम बघावं. ती तेवढंच करू शकते.अशी नकारात्मकता तिला पदोपदी सहन करावी लागते. खूप कमी घरात तिच्याविषयी सकारात्मक विचार केला जातो. राष्ट्रीय गृहिणी दिवसाच्या निमित्ताने तिची कुटुंबाबतील प्रत्येक व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी याबद्दल आमच्या निर्मल हॉस्पिटलच्या सायकॉलॉजिस्ट हेमांगी देवधर यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्या कोणत्या ते जाणून घेऊया.
सायकॉलॉजिस्ट हेमांगी देवधर यांनी ‘ति’च्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या कि, ‘स्त्री’चं मानसिक आरोग्य चांगलं कि वाईट हे कौटुंबिक आधार,मानसिक आधार,आर्थिक स्थैर्य आणि घरातील वातावरण या पातळ्यांवर ठरतं. यासाठी या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
१)कौटुंबिक आधार – घरातील कर्ती स्त्री हि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी जपते. प्रत्येकाची खाण्याची आवड जपते. नियमित फ्रेश जेवण प्रत्येकाला मिळावे याची काळजी ती घेत असते. सगळ्यांचा विचार ती करते पण तिच्या आवडी-निवडी कोणीही जपत नाही. तिला थोडा ब्रेक मिळावा यासाठी तिला जेवायला बाहेर घेऊन जाणे,जेवण बनवत असताना तिला मदत करणे, घरातील कामात तिला मदत करणे, आजारपणात तिची काळजी घेणे या छोट्या छोट्या स्टेप्स पासून सुरुवात करायला हवी.
२)मानसिक आधार – बऱ्याचदा तिची चिडचिड होत असते. ती राग राग करते. अश्यावेळी तिच्या वागण्यात असे बदल का होत आहेत याची कारणे शोधून काढली पाहिजे. हेल्थ प्रॉब्लेम काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहेत. प्रत्येक बाई बोलेल अस नाही. तिला समजून घ्या.
३)घरातील वातावरण – शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून घरातील वातावरण हेल्दी हवं. सतत वाद, भांडण असेल तर तिची मानसिक स्थिती बिघडू शकते. उदा. नियमित दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण असत. अश्या महिलांना मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतात. डिप्रेशन, एन्जायटी, अश्या समस्या जास्त प्रमाणात उध्दभवतात.
४)आर्थिक स्थैर्य – घरात काम करणारी महिला देखील स्वयंपूर्ण असावी असा विचार केला पाहिजे. ती घरीच असते तिला कशाला पैसे लागतात. लागेल ते आम्ही देतोच कि, हि मानसिकता बदलायला हवी. तिचा बँक बॅलन्स देखील स्ट्रॉंग असायला हवा.महिन्याकाठी तिला देखील काही रक्कम तिच्यासाठी देणं गरजेचं आहे.
सगळ्यात महत्वाचे ती एक माणूस आहे असं तिच्याकडे बघितलं पाहिजे. इतकं सगळं करून देखील तिला काही दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण झाल्या, मानसिक समस्या जाणवल्या तर वेळेत तिला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे आहे. याच बरोबर ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं गरजेचं. तुला काय झालाय, वेड लागलंय का? कशाला औषध बस आता असं तिला न बोलता समजून घ्या.तिची काळजी घ्या. शारीरिक, मानसिकदृष्ट्या तिला आधार द्या. यामुळे ती नेहमी पॉसिटीव्ह राहील.आणि घरातील वातारण आनंदी राहील.
या आणि अश्याच माहितीसाठी आमच्या निर्मल हॉस्पिटला भेट द्या किंवा खाली संपर्क नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. याचबरोबर अधिक माहितीसाठी आमच्या निर्मल हॉस्पिटल मिरज या युट्युब चॅनेलला भेट देऊ शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क :
Please, Like, Share & Subscribe
https://www.youtube.com/channel/UCJ3SKAaKQo5aqkJb1Vn4z9A

