EXCELLENT
405 reviews on
Suvarna Patole
Suvarna Patole
9 November 2023
माझी मैत्रीण बारावीत असताना तिला 98% मार्क मिळाले होते. ती बोर्डात पहिली आली होती. अत्यंत हुशार होती. पण College ला गेल्यापासून तिच्या वर्तनामध्ये घरच्यांना बदल जाणवला. एकट एकट राहणं , कोणाशी जास्त न बोलणं, college चुकवणं , रागराग चिडचिड करणे, Mobile चा अतिवापर करणे अशा गोष्टी ती करू लागली. त्यामुळे तिचे आईवडील काळजीत पडले होते. तेव्हा एके दिवशी तिच्या आईने मला यासंबंधी विचारले की college मध्ये काही घडलं आहे का? त्यावेळी मी या सर्व गोष्टींचा विचार केला की ह्या गोष्टी ताणतणावामुळे, social media च्या अतिवापरामुळे होत आहे. म्हणून तिच्या आईला यासंदर्भात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊयात असे सुचवले व त्यांनीही यासाठी होकार दिला. म्हणून आम्ही you tube वरती यासंदर्भात माहिती search केली व मला डॉ. चंद्रशेखर हळिंगळे सर यांचा मानसिक आजार चा एक video बघायला मिळाला. यामध्ये सरांनी हे सगळं कशामुळे होतं. यासाठी कोणते उपचार केले पाहिजेत. याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. माहिती बघून लगेचच आम्ही Hospital च्या mobile वर call केला व सर्व माहिती घेतली डॉक्टरांना भेटून treatment सुरु केली आणि पुढील 3 महिन्यात सरांच्या counselling session, co-operative hospital staff यांच्या मदतीने माझी मैत्रीण depression मधून बाहेर पडली. Thank you Nirmal Hospital, Miraj
Sangram Gaikwad
Sangram Gaikwad
6 November 2023
One Year ago I was Suffering from Negative thoughts , Suicidal thoughts. I was alone . I decided to Stop this thoughts but it was not possible For me . I have Visited to many hospital and doctors but no result . One day my friend told me these are the symptoms of Depression . Please Visit Nirmal Neuropsychiatrist , Deaddiction & Rehab Centre ,Miraj then I decided to visit Nirmal Neuropsychiatrist , Deaddiction & Rehab Centre ,Miraj . I have completed 7-8 months treatment process . Now I am completely out off these thoughts . Thank You Nirmal Hospital & Team
shekhar patil
shekhar patil
4 November 2023
Thank you Nirmal Hospital , Deaddiction & Rehab Centre , Miraj मी पुण्यामध्ये IT कंपनी मध्ये जॉब ला . माझे मूळ गाव मिरज , सांगली, (महाराष्ट्र). IT कंपनी मध्ये job असल्यामुळे घरी संपर्क खूप कमी तसा एक - दोन महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरी येत असे. त्यामुळे घरी काय चालले आहे हे माहितीच नाही आणि घरचे पण मी Tension घेईल म्हणून काय सांगत नव्हते असाच एकदा घरी गेलो . आई अंघोळ करत होती म्हणून मी निवांत बसलो पण मला थोड्या वेळाने कळले कि दोन तास झाले आई अंघोळ करण्यासाठी गेली आहे. मला पहिल्यांदा वेगळे वाटले म्हणून मी वडिलांना विचारले एवढा वेळ अंघोळीसाठी गेली आहे तर मला वडिलांनी सांगितले कि गेली ६-७ महिने असेच काय तर चालू आहे . एक - दोन तास अंघोळ करणे, पुन्हा पुन्हा हात धुणे, गॅस, दरवाजे , खिडकी बंद केले असेल तरी पुन्हा पुन्हा तपासणे करणे .वडिलांना हा कोणता आजार असेल हे माहित नव्हते. मग मी इंटरनेट वर हि सगळी लक्षणे पाहिली असता मला कळले कि हा OCD (Obsessive–compulsive disorder) यांची लक्षणे आहेत यालाच मराठी मध्ये मंत्रचाळेपणा असे म्हणतात . त्यानंतर मी ठरवले कि कोणत्या तर Psychiatrist (मनोविकार ) डॉक्टरांकडे उपचार चालू करूया म्हणून . मी Youtube वर पाहिले असता मला निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज या हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली . मी Youtube मध्ये डॉक्टर चंद्रशेखर हळींगळे सरांचा OCD (Obsessive–compulsive disorder) / मंत्रचाळेपणा याबद्दल Video पाहिला व ठरवले कि निर्मल हॉस्पिटल , व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज येथे आई चा उपचार सुरु करायचा . मी निर्मल हॉस्पिटल , व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज मध्ये आई ला घेऊन गेलो असता पहिला Assistant Doctor कडून संपूर्ण History घेण्यात आली आणि त्यानंतर Psychologist कडून Test करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर हळींगळे सरांकडे पाठवले सरांनी संपूर्ण History आणि Psychologist Test पाहून उपचार चालू केले . पहिला दहा दिवसांच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर १५ दिवसांनी Follow - Up ठेवले व दरवेळी Follow - Up ला Counselling करण्यात आले . त्यामध्ये माझी शंका होती कि उपचार किती दिवस घ्यावा लागले त्यावर Psychologist यांनी सांगितले हा आजार ६-७ महिने पासून असल्यामुळे याचे उपचार आपल्याला १ - १.५ वर्षे घ्यायला सांगितले . त्यानंतर एक शंका होती हा आजार किती दिवसांमध्ये Cover होऊ शकतो . त्यामध्ये Psychologist यांनी सांगितले कि हा आजार आपण Cure (बरा) करू शकत नाही पण Control (मर्यादित) करू शकतो. या उत्तरामुळे माझी आणखी एक शंका होती हा आजार पुन्हा होऊ शकतो तर Psychologist यांनी सांगितले कि जसा सर्दी , ताप परत येऊ शकतो तसा हा आजार पण पुन्हा होऊ शकतो . या आजाराला आपण Control (मर्यादित) मध्ये ठेऊ शकतो . माझ्या सर्व शंकांचे उत्तर Psychologist यांनी खूप साध्या व मला कळेल या भाषेत दिले . तसे आता उपचार सुरु करून १ वर्षे झाले आहे . आता माझ्या आई मध्ये मला आणि वडिलांना ९० % फरक दिसत आहे . दर वेळी Follow - Up गेलो कि स्टाफ चे वागणे , Psychologist Counselling , डॉक्टरांचे बोलणे खूप चांगले होते .त्याबद्दल पुन्हा एकदा निर्मल हॉस्पिटल , व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज आणि डॉक्टर चंद्रशेखर हळींगळे सरांचे धन्यवाद…
Harshada Mohite
Harshada Mohite
31 October 2023
Overall treatment is good. The services were good and the staff and doctors were excellent in all ways. Thanks, everything was good. The doctors and staff are very friendly to us.