व्यसना बद्दल प्रश्नोत्तर

व्यसना बद्दल प्रश्नोत्तर

व्यसना बद्दल प्रश्नोत्तर

व्यसन कोणत्या पदार्थांचे असू शकते ?

  • दारू.
  • तंबाखू ,सिगरेट, बीडी, गुटखा, मावा, खैनी.
  • भांग,गांजा, चरस.
  • ब्राऊन शुगर, अफू, पावडर , हेरॉईन.
  •  टीव्ही, व्हाट्सअँप, फेसबूक, सेल्फी.  

मला व्यसन आहे का???

स्वतःला विचारायचे प्रश्न ???

  • मी रोज तंबाखू  खातो का?
  • सिगरेट ओढतो का?

नाही खाल्ले तर त्रास होतो का?

उदा:– “चिडचिड, लक्ष न लागणे, झोप न लागणे, घाबरल्यासारखे वाटणे, थरथर कापणे, सकाळी शौचास न होणे.

व्यसन का लागते ???

1)अनुकरण – आई वडिलांचे इतर व्यक्तींचे.

जर आई किंवा वडील लहान मुलांसमोर कोणत्याही प्रकारे तंबाखूचा वापर करत असतील तर मुले हे चित्र मनात टिपतात.

संस्कार ही गोष्ट केवळ पुस्तकातून किंवा वाचनातून होत नाही. तर संस्कार ही गोष्ट लहान मुलं पाहण्यातून अधिक प्रमाणात घेत असतात.

तुम्ही काय सांगता शिकवता किंवा वाचायला लावता यापेक्षा आपल्या वागण्यातून आपण अधिक संस्कार देत असतो. मुले ती टिपत असतात म्हणून आपली वर्तणूक महत्वाची असते. म्हणून पालकांनी याबाबतीत जागरूक असायला हवे.

2)इतर मुलांचा आग्रह.

किशोरवयात किंवा मोठ्या वयोगटात व्यसन करणाऱ्यांचा समूह असेल तर इतर मुलांना समूहामध्ये सामील करून घेण्यासाठी व्यसन करण्याचा आग्रह करतात व त्यामुळे व्यसन लागू शकते.

3)कुतूहलता.

सहज उपलब्ध आहे म्हणून किंवा चमचमणाऱ्या पुड्यातून काय आहे ते पाहूया म्हणून देखील मावा, गुटख्याच्या पुड्या फोडल्या जातात आणि व्यसनाची सुरुवात होऊ शकते.

माझे पप्पा किंवा मित्र नाकातून धूर कसा काढतात याचे कुतूहल म्हणून.

4)वैयक्तिक कारण.

* चैनीसाठी.

* उत्सुकता.

* मजा म्हणून.

5)मानसिक कारण.

  • चिंता.
  • ताण तणाव दूर करण्यासाठी.
  • अपयश.
  • उदासीनता.
  • प्रेमभंग.
  • दु:ख विसरण्यासाठी.
  • वेदना विसरण्यासाठी.               

6)अनुवंशिकता.

वडिलांना, आईला किंवा दोघांना व्यसनाचा आजार असल्यास हा आजार मुलांमध्ये येऊ शकतो.

Passive Smoking म्हणजे काय ? 

धूम्रपान करून आपण केवळ आपलेच आरोग्य बिघडवतो असे नाही तर आपल्या आजूबाजूच्या निष्पाप व्यक्तींचा आरोग्यालाही आपण धोका निर्माण करत असतो.

Leave a Reply